नगरला आहेत चार मंत्री पण त्यांचा पत्ता नाही; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

अहमदनगर :

नगर जिल्ह्यात चार मंत्री आहेत. तीन जिल्ह्याचे व एक पालकमंत्री. पालकमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी नगरला मिटिंग घेतली, व त्या मिटिंगनंतर त्यांना कोविड झाला व तेच क्वारंटाइन झाले. प्रत्येक महिन्यात एक तरी मंत्री क्वारंटाइन होतो. चार मंत्री नगरला लाभले. पण या मंत्र्यांचा कुठे पत्ता नाही, हे घराच्या बाहेर येईनात, अशीच परिस्थिती आहे, असे म्हणत भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी टीका केली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता नगर भाजपने त्यांना सुनावले आहे. पुढे मुंडे यांनी सांगितले की, आम्हीही कोविड सेंटरमध्ये काम करतो. पण आम्हाला क्वारंटाइन होण्याची वेळ आली नाही. पण मंत्र्यांना समाजाची सेवा करायची नाही, म्हणून त्यांना क्वारंटाइन व्हावे लागते.

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

‘हे सर्वजण लोकांना फसवून सत्तेत आल्यामुळे त्यांच्या कारभार कुठेही व्यवस्थित चालू नाही. जनतेला यांना मदत करायची नाही, अशी भूमिका सरकारची आहे’, असा आरोपही मुंडे यांनी यावेळी केला. यावेळी मुंडे यांच्यासह भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, मनोज कोकाटे, दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक आदी उपस्थित होते.     

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here