ब्रेकिंग : त्यामुळे ९ दहशतवादी झाले जेरबंद; वाचा महत्वाची बातमी

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळ राज्याच्या एर्नाकुलम येथून ९ दहशतवाद्यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. ही घातक मंडळी दिल्ली एनसीआर आणि इतर वर्दळीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करणार होती.

दहशतवादाबाबत दोन महिन्यांपूर्वीच संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) एक विशेष अहवाल जारी केला होता. त्यामध्ये म्हटले होते की, केरळ आणि कर्नाटकमध्ये मोठ्या संख्येने आयएस दहशतवादी असू शकतात. तसेच संपूर्ण भारतीय उपखंडात अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट अल कायदा (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेने रचल्याचा दावाही अहवालात केला होता.

 

आसिम उमर याच्या मृत्यूचा बदला घेण्यसाठी एक्यूआयएसचा सध्या मुख्य सूत्रधार ओसामा महमूद हा या भागात कट रचत असल्याचे त्यात म्हटले होते. भारतीय उपखंडात अल कायदाचे सुमारे २०० दहशतवादी कार्यरत आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार येथील ते असून उपखंडात अल कायदा हा आयएसचा सहकारी आहे असेही त्यात म्हटले होते. त्यानुसार लक्ष ठेऊन केलेल्या कारवाईत हे ९ जण जेरबंद करण्यात एनआयएला यश आले आहे.

 

संपादन : सचिन मोहन चोभे

 

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here