धक्कादायक : तो पत्रकार देत होता चीन्यांना खुफिया जानकारी; वाचा देशविरोधी कृत्य करणाऱ्याची बातमी

पैशांसाठी कोण माणूस कोणत्या थराला जाईल याचा काहीही नेम नाही. अनेकदा देशविरोधी कृत्यामध्येही माणसे सहभागी होतात. अगदी संरक्षण करणारे पोलीस आणि सैनिकांनाही असल्या प्रकरणात पकडण्यात आलेले आहे. आताही दिल्लीतील एका पत्रकाराला चीनला महत्वाची माहिती देऊन पैसे कमावण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे.

दिल्ली पोलिसांचे डीसीपी संजीव कुमार यादव यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, प्रत्येक बातमीचे १ हजार डॉलर अशा रेटने मुक्त पत्रकार असलेले राजीव शर्मा हे चीनला गोपनीय माहिती पुरवीत होते. अशा पद्धतीने शर्मा यांनी ४५ लाख रुपये कमावले आहेत. २०१६ पासून ते चीनी अधिकाऱ्यांना भारतीय सैन्य आणि सीमेवरील महत्वाची माहिती देत होते.

दिल्ली पोलिसांनी नुकतेच एका चीनी महिला आणि नेपाळी माणसाला संशयित म्हणून पकडले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढे कारवाई करताना शर्मा नावाचे हे पत्रकार पकडण्यात आलेले आहेत. चीनच्या ग्लोबल टाईम्स यामध्येही शर्मा यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहे.त एकूणच यामुळे देशविरोधी कृत्य केल्याप्रकरणी एका पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here