ब्रेकिंग : म्हणून पाकिस्तानमध्ये आढळले ‘त्या’ रोगाचे ९ पेशंट; वाचा महत्वाची बातमी

 

जगभरात करोना विषाणूचे थैमान चालू असतानाच आता पाकिस्तान या शेजारील देशात जुनाच एक विषाणू फोफावत आहे. जगभरातून उच्चाटन होत आलेल्या पोलिओ रोगाचे रुग्ण तिथे सापडल्याने खळबळ उडाली आहे.

 

जगभरातून पोलिओचे उच्चाटन होत आलेले आहे. असे असतानाही पाकिस्तानात मात्र या रोगाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे दिसले आहे. आतापर्यंत त्या देशात पोलिओच्या पुन्हा नऊ केसेस आढळून आल्या आहेत. परिणामी पाकिस्तान नाही तर जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्‍त केली आहे.

 

WHO वाल्यांनी म्हटले आहे की, पोलिओ रोगाचे पाकिस्तानातील अस्तित्व चिंता नक्कीच वाढवणारे आहे. तेथे पोलिओ लसीकरणालाच विरोध होणे ही बाबही त्यापेक्षा जास्त घातक आहे. पंजाब आणि बलुचिस्तान प्रांतात नव्याने पोलिओचे रुग्ण आढळून आले आहेत. ही बालके पूर्णपणे अपंग झाली आहेत. पंजाब प्रांतातील पाच, तर सिंध प्रांतातही दोन पोलिओ रुग्ण झालेली बालके आढळून आली आहेत.

 

जगभरात सध्या पाकिस्तान हाच एकमेव देश असा आहे जिथे पोलिओचे रुग्ण आढळून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार सावधगिरीच्या सूचना देऊनही तेथील सरकार व जनता यांनी त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. इस्लामिक कट्टरपंथीयांच्या संघटनांनी पोलिओ लसीकरण मोहीमच इस्लामविरोधी ठरवून या लसीकरण पथकातील काही जणांवर हल्ले करून त्यांना ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने यंदा देशभरात एकूण 72 पोलिओ केसेस आढळून आल्याचे नमूद केले आहे.

 

संपादन : सचिन पाटील

Posted by कृषीरंग on Thursday, September 17, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here