तरीही कांद्याचे भाव वाढतायेत; पहा महाराष्ट्रातील बाजारभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने खोड घालण्याचा प्रयत्न करूनही बाजारात पुन्हा एकदा कांद्याचे भाव वाढत आहे. मात्र, जर निर्यात चालू असती तर हेच भाव सध्या ४५ रुपये किलोपर्यंत पोहोचले असते असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

निर्यातबंदी निर्णय घेतल्यावर बाजारातील कांदा दरवाढीचा ट्रेंड पहिले काही दिवस घसरला. मात्र, पुन्हा एकदा या नगदी पिकाने बाजारात उचल खाल्ली आहे. कालच्या तुलनेत अनेक ठिकाणी आज बाजारात ५० ते २२० रुपये इतकी सरासरी वाढ झाली आहे. अशा पद्धतीने उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा यातून चांगला नफा मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. पावसामुळे पिक खराब होत असल्याने बाजारात भाव वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

 

शनिवार दि. १९ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर292080032002000
औरंगाबाद62730023001300
मंगळवेढा1530020501500
कराड201100020002000
सोलापूर1323510035001500
धुळे119610028002400
पंढरपूर32110028502060
खडकी-पुणे13100021001550
पिंपरी-पुणे9200020002000
मांजरी-पुणे44110022001500
मोशी-पुणे69100014001200
वाई18100023001650
शेवगाव नं १897250035002500
शेवगाव नं २330140024002400
कल्याण3100020001500
शेवगाव नं ३18930013001300
चंद्रपूर345180025002000
अहमदनगर2700580032002500
येवला700040034362800
अंदरसूल-येवला400030033012700
नाशिक89560030002650
लासलगाव2800100030802700
निफाड3100114130012651
विंचूर3817120032603050
मुंगसे-मालेगाव600080532502850
मनमाड100040028662600
कोपरगाव165025031112750
घोडेगाव-नेवासा16412100034003000
पिंपळगाव बसवंत733168137122751
सायखेडा267070029012650
वैजापूर275430035002500
नामपूर818100028652400

 

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here