IPL2020 : पहा कशामुळे यंदाची स्पर्धा आहे वेगळी; आजपासून होणार दणक्यात सुरुवात

जागतिक क्रिकेटमध्ये अर्थकारण आणि स्पर्धा यांच्यातील जोश वाढवणारी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग ‘आयपीएल’ शनिवारपासून सुरू होत आहे. यंदा पुन्हा एकदा यूएईत ही स्पर्धा रंगणार आहे. या देशात दुसऱ्यांदा होत असलेल्या स्पर्धेत ८ संघ एकमेकांशी झुंजतील.

 

यंदाची आयपीएल स्पर्धा ही यापूर्वी संपली तेथूनच सुरू होणार असल्याने पहिली लढत गतविजेती मुंबई इंडियन्स व उपविजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होईल. आज अबुधाबीत संध्याकाळी ७:३० वाजता हा सामना सुरू होईल. पुढील ५३ दिवस ही स्पर्धा चालणार आहे. एकूण तीन स्टेडियममध्येच ६० सामने होतील. अखेरची म्हणजे विजेतेपदाची लढत दि. १० नाेव्हेंबर २०२० रोजी होईल. दुबई शहरात २४, अबुधाबी इथे २० व शारजा येथील मैदानात १२ सामने होतील.

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

  • कोरोनामुळे यंदा बक्षिसाची रक्कम निम्मी केल्याने विजेत्या संघास यंदा २० कोटींऐवजी १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल.
  • यंदा अनलिमिटेड कोरोना सब्सिट्यूट ठेवता ययेणार असल्याने फलंदाजाला फलंदाज, तर गोलंदाजालाही गोलंदाजच रिप्लेस करता येईल.
  • यंदा मैदानात पहिल्यांदाच प्रेक्षक आणि चिअर लीडर्स नसतील. फ़क़्त स्टाफ, वर्कर्स, अंपायर, खेळाडू आणि अधिकारी इतकेच सगळे तिथे असतील.
  • या स्पर्धेत प्रथमच फ्रंट फूट नो-बॉल फील्ड अंपायरऐवजी थर्ड अंपायर देईल.
  • डोक्यावर चेंडू लागून जखमी झालेल्या खेळाडूऐवजी दुसऱ्याला बदली खेळाडू खेळण्यासाठी पाठवता येण्याचा कन्कशन नियम प्रथमच लागू असेल.
  • चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करता येणार नाही.

संपादन : सचिन पाटील

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here