IPL2020 : कोहली, बुमराह आणि ख्रिस गेल यांना ‘हे’ वर्ल्डरेकॉर्ड करण्याची संधी

 

आजपासून पुढील ५३ दिवस युईए या देशातील शारजा, अबुधाबी आणि दुबई येथे आयपीएल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत विरत कोहली, ख्रिस गेल आणि जसप्रीत बुमराह यांना वर्ल्डरेकॉर्ड करण्याची संधी आहे.

बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली हा टी-२० मध्ये ९ हजार धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरू शकतो. यासाठी त्याला फक्त १०० धावा हव्या हव्या आहेत. पहिल्याच १-२ सामन्यात तो हा विश्वविक्रम आपल्या नावावर करण्याची चिन्हे आहेत.

ख्रिस गेल हा रांगडा खेळाडू म्हणजे चौके-छक्के मारणार्यांचा महामेरू. तोही टी-२० क्रिकेटमध्ये एक हजार षटकार मारणारा पहिला खेळाडू बनण्याची चिन्हे आहेत. यासाठी त्याला आणखी २२ षटकार ठोकावे लागतील. तो त्याच्या डाव्या हाताचा मळ असेल असेच त्याच्या चाहत्यांना वाटते.

तर, जसप्रीत बुमराह याने आणखी फ़क़्त १८ बळी घेतले की टी-२० मध्ये २०० बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गाेलंदाज ठरू शकतो. त्याच्याकडूनही त्यांचा संघ आणि चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

 

संपादन : सचिन पाटील

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here