शेतीसाठीची यंत्र मिळतात ‘या’ योजनेतून; लगोलग अर्ज भरून पावती घ्या

शेतकऱ्यांना आधुनिक करतानाच शेतीपद्धती आणखी सुकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे विविध योजना राबवल्या जातात. अनेक योजना केंद्र सरकारकडूनही राबवल्या जातात. आताही कृषी यांत्रिकीकरण योजना यासाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांनी तातडीने हे अर्ज भरून घेऊन त्याची पावती जपून ठेवावी.

 

कृषी विभागाने याबाबाबत आवाहन केले आहे. त्यात म्हटले आहे, ‘सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की सन २०२०-२०२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू झाली आहे. ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत औजारे जसे की रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, नांगर, कापणी यंत्र, फवारणी यंत्र आदि खरेदी करायचे असतील अशा शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र शासनाच्या mahadbtmahait.gov.in पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. लाभार्थी निवड लकी ड्रॉ अर्थात सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्ज भरल्याची पावती जपून ठेवावी.

आवश्यक कागदपत्रे अशी : 7/12 व 8 अ उतारा, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक आदि.

 

संपादन : माधुरी सचिन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here