सरकारी रुग्णालयांतून आरोग्य सेवा मिळण्याची बोंब कायम असल्याने सध्याही खासगीला जास्त महत्व आहे. येथील सेवा-सुविधेचे करोना रुग्णांचे किती बिल घ्यायचे हे राज्य सरकराने जाहीर केले आहे. त्यापेक्षा जास्त बिल घेतल्यास तपासणी करून पाठीमागे देण्याचेही निर्देश आहेत. असाच प्रकार १५० नगरकरांना फायदेशीर ठरणार आहे.
नगर शहर व जिल्ह्यामधील रुग्णांना याद्वारे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या कोविड १९ रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा तब्बल २ लाख १९ हजार ३७० रुपये जास्तीचे बिल आकारल्याचाही एक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हास्तर समितीने तपासणी केली होती. ही रक्कम संबंधित रुग्णालयांकडून वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनाही देण्यात आलेले आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी १ लाख उपाये ही रक्कम निर्धारित केलेली आहे. त्यापेक्षा जास्त बिल झाल्यास त्यांची तापांनी केली जाते. नगरमध्ये १ लाखापेक्षा जास्त बिलांची आकारणी करण्यात आलेल्या बिलांची ६ ऑडिटरांच्या ६ पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. पथकांनी आतापर्यंत २८७ बिले तपासली आहेत. त्यात १५० बिलांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. याद्वारे ४५ लाख २८ हजार ६८० रूपये शासनाच्या निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त घेण्यात आल्याचे आढळले आहे. असा अहवाल उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे.
पहिल्या टप्प्यात या समितीने ४ रुग्णालयांच्या २० बिलांवर आक्षेप घेतला आहे. त्याचे २ लाख १९ हजार ३७० वसुलीची रक्कम निश्चित केली आहे. ही रक्कम वसूल करून संबंधित रुग्णाला देण्याबाबत मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना आदेश जारी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
संपादन : महादेव गवळी
होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…
Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020