म्हणून तुकाराम मुंढे यांना नागपूरला परत आणा; पहा काय म्हणतायेत शिवसैनिक

नागपूरचे आयुक्त म्हणून पूर्ण कार्यकाळ होण्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. नेहमीच्या स्टाईलने काम करताना मुंढे यांनी भाजप आणि इतरही पक्षाच्या नेत्यांचा पदोपदी अपमान केल्याच्या तक्रारी होती. त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांना पुन्हा मागे आणण्याची मागणी आता नागपूरच्या शिवसैनिकांनी केली आहे.

 

नागपुरातील कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालल्याने त्यांची बदली रद्द करुन, पुन्हा नागपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्त करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पक्षाचे नागपूर उपजिल्हाप्रमुख आणि नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. मुंढे यांच्या अनेक उपाययोजनांमुळे नागपुरातील स्थिती चांगली होती. मात्र, आता वाढते रुग्ण आणि प्रशासनाची किंवा आरोग्य विभागाची कामगिरी पाहता पुन्हा एकदा शहरात त्यांचीच गरज आहे असे त्या पत्रात म्हटले आहे.

 

‘नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अथक प्रयत्न करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नाही. आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे. तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त असताना नागपुरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यामुळे त्यांची पुन्हा नागपुरात आयुक्त म्हणून बदली करा’, से कुमेरिया यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, 26 ऑगस्ट रोजी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. त्यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सचिवपदी झाली. मात्र अवघ्या 15 दिवसात त्यांची बदली रद्द झाली. त्यामुळे त्यांच्या नव्या नियुक्तीची उत्सुकता सर्वांना आहे.

 

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here