म्हणून ट्विटरकर विचारतायेत आरोग्यमंत्र्यांना प्रश्न; दिवसभरात वाढले इतके रुग्ण

राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे काहीही चिन्हे दिसत नाहीत. भारतातील रुग्णसंख्येत मोठा वाटा अजूनही महाराष्ट्र राज्याचा आहे. याबाबत अनेकांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे उत्तर मागितले आहे.

 

टोपे यांनी रोज माहिती जशी माहिती देणारी ट्विट टाकण्याचा ट्रेंड केला आहे. त्यात त्यांनी आज म्हटले आहे की, राज्यात आज 21656 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 22078 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 834432 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 300887 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 71.47% झाले आहे.

 

त्यावर सुहास कवलकर यांनी म्हटले आहे की, ज्या कारणामुळे कोरोना वाढतो त्याच्यावर तर तुम्ही काही करत नाही आहे. मग कसा कोरोना नियंत्रणात येणार? राज्या बाहेरून येणाऱ्या लोकसंख्ये वर काही नियंत्रण करा. त्या शिवाय कोरोना कमी नाही होणार. कोण कुठूनही येतो आहे. टेस्ट करून येतो आहे कि नाही ह्याची काहीच पडताळणी होत नाही आहे. फक्त आकडे सांगत आहात तुम्ही पण कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी काही करत तर नाही आहात. राज्या बाहेरून येणाऱ्या लोकांन मुळे कोरोना होत नाही का? आणि राज्यातल्या लोकांनमुळे होतो का ज्या बाहेरच्या ट्रेन चालू आहेत आणि राज्यातल्या बंद. बाहेरून येणाऱ्या लोकांवर काही निर्बंध आहेत कि नाही?

 

अमरसिंग तालतकर यांनी म्हटले आहे की, साहेब , मग कसले आकडे द्यायचे ? थोडस बाहेरच्या राज्यातील बातम्या पण पाहत जा म्हणजे समजेल आपली आरोग्य व्यवस्था चांगली आहे का नाही ! आणि असले प्रश्न केंद्राला पण विचारत जा त्यांना पण महाराष्ट्रातील जनतेने मतदान दिलेले आहे. का फक्त pmcare साठी महाराष्ट्रातील जनता लागते का?

 

तर, गजानन झालके म्हणतात की, साहेब आरोग्य विभाग थेट भरती करणार आहे की नाही हे तरी सांगावे? लवकरात लवकर थेट भरती करून आम्हाला दिलासा द्यावा.आम्ही गरीब,शेतकऱ्यांची मुल आहोत,साहेब.आता अजून किती दिवस वाट बघावी आम्ही.

 

संपादन : सचिन मोहन चोभे

Posted by कृषीरंग on Thursday, September 17, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here