कृषी बिलामुळे शेतकऱ्यांना हे चार फायदे होणार; पाहा काय म्हटले मोदीजींनी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कृषीसंबंधी बिलावर उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विरोधकांवर जोरदार टीका केली. नेहमीच्या स्टाईलने टीका करताना त्यांनी हे विधेयक कसे क्रांतिकारी असल्याचे मुद्दे पटवून देण्याचाही प्रयत्न केला.

 

बिहारमध्ये विकास योजनांच्या उद्घाटनांनतर व्हिडिओ प्रचार रॅलीत संबोधित करताना ते विरोधकांवर जोरदार बरसले. आपले राजकारण चमकवण्यासाठी विरोधक शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत आणि खोटे बोलत असल्याचे सांगतानाचा त्यांनी विधेयकांचे फायदेसुद्धा सांगितले.

 

१. शेतकरी बंधुंना बंधानातून मुक्त करणाऱ्या या सुधारणांमुळे शेतकर्‍यांना आपले उत्पादन विकण्यासाठी जास्त पर्याय आणि संधी मिळतील.

 

२. शेतकरी आणि ग्राहकांमध्ये जे आडते व दलाल आहेत तेच शेतकर्‍यांच्या कमाईचा मोठा भाग घेतात. त्यांच्यापासून वाचण्यासाठी हे विधेयक आणणे आवश्यक होते. हे विधेयक शेतकर्‍यांसाठी सुरक्षाकवच आहे.

 

३. सरकारकडून शेतकर्‍यांना एमएसपीचा लाभ दिला जाणार नाही, हेसुद्धा खोटे आहे. आमचे सरकार शेतकर्‍यांना एमएसपीच्या माध्यमातून योग्य भाव देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. सरकार खरेदी सुद्धा पूर्वीप्रमाणे सुरूच ठेवणार आहे.

 

४. कुणीही व्यक्ती आपले उत्पादन हवे तिथे विकू शकतो, मात्र शेतकर्‍यांना या हक्कापासून वंचित ठेवले होते. आता नव्या तरतुदींमुळे शेतकरी आपले पीक देशातील कोणत्याही बाजारात हव्या त्या भावात विकू शकतात.

 

 

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here