मोदी सरकारला मोठा झटका; पहा कोणी सोडली NDA ची साथ

 

फार्मर्स बील हा देशभरात वादाचा मुद्दा बनला आहे. अशावेळी आपल्याच मित्रांचा विरोध असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हे वादग्रस्त बील लोकसभेत मंजूर करून घेतले. त्यामुळे शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

 

पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी या मुद्यावर आपला विरोध असल्याचे मोदी सरकारमधील सर्व जबाबदार घटकांच्या कानावर घातले होते. नुकतेच पंजाब आणि हरियाना येथील लाखो शेतकऱ्यांनी या कायद्याच्या विरोधात मोठे आंदोलन केले होते. तेही सरकारने पोलिसांच्या लाठीचार्जद्वारे मोडीत काढण्याचे आरोप झाले होते.

 

त्यातच आज लोकसभेत विरोधी पक्षांचा विरोध असतानाच भाजपचा खूप जुना मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाचाही त्याला विरोध होता. शिरोमणी अकाली दलाने यावेळी विरोधातही मतदान केले. त्यानंतरही मोदी सरकारकडून याची काहीच दखल घेतली न गेल्याने अखेरीस आता अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मोदी सरकारला हा एक धीरे वाटणारा पण जोर का झटका असल्याचे म्हटले जात आहे.

 

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here