महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते कमी आणि आगीत तेल ओतण्यासाठी प्रसिद्ध म्हणून ओळख पावलेल्या अवधूत वाघ यांनी आता आणखी एक भन्नाट ट्विट करून चर्चेला तोंड फोडले आहे. त्यांनी भाजपाला उर्मिलापेक्षा कंगना जवळची का आहे याचेच उत्तर दिले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, उर्मिला जरी मराठी असली व कंगना परप्रांतीय तरीही कंगनाच आम्हाला जवळची आहे. मराठी गणोजी शिर्केपेक्षा #छत्रपती_संभाजी_महाराजयांना साथ देणारा परप्रांतीय कवी कलश हाच आम्हाला जवळचा आहे.
मराठी अस्मिता या मुद्यावर त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे अनेकांनी आपल्याही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यावर राजकुमार कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, कवि कलश कुठे ही तुमची कंगना कुठे कुणाच कुणाबरोबर तुलना करत आहात आम्हाला आमची मराठी उर्मिला जवळची आहे हीच आमची मराठी अस्मिता.
तर, जीवन पाचपुते यांनी खोचक टोला लगावला आहे की, अवधूत वाघ पण तुमच्या पक्षात संभाजी महाराज यांच्या एवढे कुणी बुद्धिमान आहे का ?? निदान स्वतःकडे बघून तरी एकदा विचार करा… काहीही उदाहरण देता.
अंकुश लांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, कवी कलश महाराष्ट्रा च्या मातीशी आणि छ.शंभुराजांशी प्रामाणिक होते,निष्ठावान होते.कंगनाची कोणती निष्ठा दिसली यांना.मग उद्या यांना औरंगजेब ही जवळचा वाटेल का ? कुणाचीही तुलना कुणाशीही नका करु वाघसाहेब.
संपादन : सचिन मोहन चोभे
उर्मिला जरी मराठी असली व कंगना परप्रांतीय तरीही कंगनाच आम्हाला जवळची आहे.
मराठी गणोजी शिर्केपेक्षा #छत्रपती_संभाजी_महाराज यांना साथ देणारा परप्रांतीय कवी कलश हाच आम्हाला जवळचा आहे.#मराठी_अस्मिता@KanganaTeam— Avadhut Wagh अवधूत वाघ (@Avadhutwaghbjp) September 18, 2020