घरबसल्या खोलू शकता बचत आणि कर्ज खातेही; HDFC बँकेने आणली खास सुविधा

रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या नव्या निर्देशानुसार प्रत्यक्ष जाऊन केवायसी KYC (Know Your Customer)  करण्यासह व्हिडिओ केवायसी (Video KYC) करण्याचीही सुविधा खुली झालेली आहे. त्याच नियमाच्या आधाराने एचडीएफसी बँक यांनी आता घरबसल्या खाते खोलण्याची सुविधा आणली आहे.

बँकेत आपल्याला बचत, पगार किंवा कर्ज खाते उघडतानाही याचा फायदा होईल. ग्रुप हेड (रिटेल ब्रांच बैंकिंग) अरविंद वोहरा यांनी याबाबत सांगितले आहे की, एक पायलट प्रोजेक्ट राबवून ट्रायल घेऊन ही सुविधा बँकेने सुरू केली आहे. पुढील काळात टप्प्याटप्प्याने याचा विस्तार केला जाईल.

  एकूणच व्हिडिओ केवायसी करण्यासाठी बँक ग्राहक भारतीय असावा आणि सध्याही तो भारतात राहायला असावा. मग बँक अॅप्लिकेशन प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करून या सुविधेचा लाभ घेणे शक्य आहे. त्यासाठी बँकेच्या शाखेच्या परवानगीने सर्व प्रक्रिया पार पडावी लागते. फ़क़्त आधार कार्ड आणि pan कार्ड यासह व्हिडिओ केवायसी पूर्ण करून झाल्यावर मग बँक त्यानुसार आपल्याला तातडीने खाते खोलून देऊ शकते.

  संपादन : सचिन पाटील

  होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

  Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here