नगरचे पालकमंत्री मुश्रीफांना आहे ‘त्या’ भाजप नेत्याच्या सल्ल्याची गरज; पत्रकार परिषदेत तुफान टोलेबाजी

अहमदनगर :

अहमदनगरचे पालकमंत्री व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचे नगरकडे लक्ष नाही, असा एक सूर नगरच्या नेत्यांकडून येत होता. त्यानंतर माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘सरकारमध्ये काम करणारे सत्ताधारी पक्षातील लोकांचा पब्लिसिटी इव्हेंट चालू आहे. त्यांना जनतेची काळजी नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तर नेमकी कशाची काळजीय ?’, असा टोला मुश्रीफांना लगावला होता. याच पार्श्वभूमीवर ‘राधाकृष्ण विखे हे ज्येष्ठ नेते आहेत व मी ज्युनियर आहे, म्हणून मी बोलावलेल्या बैठकीला ते आले नसावेत. पण मला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे’, असे म्हणत आपल्यावर केलेल्या टीकेचा समाचार मुश्रीफांनी घेतला.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, मी आधीच सांगितलं होतं की महिन्यातून किमान एकदा नगरला जिंदा किंवा मुडदा येईनच. गेल्या आठ महिन्यात मी १४ वेळा नगरला आलोय. १४ ऑगस्टला मी जी बैठक घेतली त्याला सर्व लोकप्रतिनिधींना बोलवले होते. त्या बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी आले, पण राधाकृष्ण विखे आले नाहीत.

‘नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज काढण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. नगर मला सुंदर करायचे आहे. ते माझं स्वप्न करोनाच्या परिस्थितीतून बाहेर पडल्यावर नक्की पूर्ण करू’, असेही पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here