विरोधक व मित्रांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून मोदी सरकारने संमत केले ‘हे’ महत्वाचे विधेयक

एकदा एखादा निर्णय घेण्याचे मनावर घेतले आणि त्याचेही काहीही परिणाम व दुष्परिणाम होणार असले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचा भाजप त्यापासू मागे हटत नाही. आताही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाचा विरोध असतानाही मोदी सरकारने आवश्यक वस्तु (संशोधन) विधेयक 2020 हे लोकसभेत मंजूर करून घेतले.

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

पंजाब, हरियाना आणि इतर राज्यांमधील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही मोदी सरकारने दणक्यात हे विधेयक मंजूर करून घेऊन पुन्हा एकदा पोलादी पक्ष असल्याची साक्ष दाखवून दिली आहे. शिरोमणि अकाली दल यांचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे आवाहन करूनही भाजपने त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे आता खाद्यान्न, अन्नधान्य, डाळी, तेल, बटाटा आणि कांदा हे यापुढे जीवनावश्यक यादीत राहणार नाहीत. एकूणच भाजपने हा क्रांतिकारी निर्णय असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल असेच म्हटले आहे.

तर, शेतकऱ्यांनी हा शेतकरी विरोधी आणि व्यापारी व मोठ्या कंपन्या यांना फायदेशीर असा निर्णय असल्याचे म्हटले आहे. नुकतेच पंजाब आणि हरियाना येथील लाखो शेतकर्यांनी या कायद्याचा विरोधात रस्त्यांवर उतरून आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला होता. आताही संसदेत मित्रपक्षांच्या आवाहनालाही दाद न देता भाजपने हा निर्णय दामटला आहे. शिरोमणी अकाली दलासह तृणमूल कॉंग्रेसनेही याला जोरदार विरोध केला.

संपादन : सचिन मोहन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here