प्रबोधनकार ठाकरे जयंती विशेष : म्हणून प्रबोधनकारांनी शिवाजी महाराजांना ‘दगलबाज’ म्हटले; वाचा या शब्दामागचा इतिहास

मुंबई :

केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. whatsapp वरून एखाद्याची किंमत करणाऱ्या आपल्या पिढीने प्रबोधनकार ठाकरेंना कदाचितच वाचले असेल. आपल्याला फार फार तर दोनच गोष्टींमुळे प्रबोधनकार ठाकरे माहिती आहे.

  • शिवसेनेच्या स्थापनेचे बीज हे प्रबोधनकारांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. शिवसेना संघटनेचे नाव त्यांनीच सुचवले होते.
  • प्रबोधनकारांनी दगलबाज शिवाजी नावाचे पुस्तक लिहिले.

या २ गोष्टींमुळे आपल्या प्रबोधनकार माहिती असले तरी त्यातही आपण मुख्यत: दगलबाज अशी प्रतिमा शिवाजी महाराजांची केली म्हणून प्रबोधनकार ठाकरेंना वाचण्याचे टाळतो. दुसरे म्हणजे शिवाजी असा एकेरी उल्लेख केला म्हणूनही आपण हे पुस्तक वाचण्याचे टाळतो. म्हणूनच आज या दिवसाच्या निमित्ताने का होईना आपल्यासमोर दगलबाज शिवाजी या पुस्तकातील काही अंश आणत आहोत.

 “…अर्जुन ‘बगलबाज’होता. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून विहित कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा न्हवता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पाडणारा ‘दगलबाज’ होता. बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानासमोर उभा ठाकलेला शिवाजी,यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. ‘दगलबाज’ आणि ‘दगाबाज’ यातील भेदच लोकांना समजत नाही. दगलबाज म्हणजे ‘डिप्लोमॅट’ दगाबाज म्हणजे ‘ट्रेचरस’. इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here