म्हणून ४०० ट्रक कांदा पडलाय रस्त्यात अडकून; पहा कुठे आणि कसा झालाय हा प्रकार

कांद्याच्या निर्यातबंदीचा मोठा निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मास्टरस्ट्रोक हाणला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथील कांदा उत्पादकांना मोठा झटका बसला आहे. अशावेळी बांगलादेश या देशात निघालेला सुमारे ४०० ट्रक कांदा पश्चिम बंगाल राज्यात सीमेवरच अडकून पडला आहे.

भारतीय व्यापाऱ्यांनी कांद्याच्या निर्यातीला खोडा घातली जाण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने दणक्यात निर्यात सुरू केली होती. त्यानुसार परदेशातील व्यापाऱ्यांशी सौदे झालेले होते. मात्र, मध्येच बिहार निवडणुकीत झटका बसण्याच्या भीतीने मोदी सरकारने कांद्याची निर्यात बंद करून टाकली. परिणामी बांगलादेशला जाणारा कांदा सध्या सीमेवर आहे.

  ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनाइजेशन’ (फियो) यांचे महानिदेशक अजय सहाय यांनी इकॉनॉमिक टाईम्स यांच्याशी बोलताना याबद्दल म्हटले आहे की, अगोदरच झालेले सौदे आणि जाणारा कांदा आता पोहोच करण्यासाठीची कार्यवाही होण्यासाठी केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे. तर, महादीपुर क्लीयरिंग एंड फॉरवर्डिेग एजेंट्स वेलफेयर एसोसिएशन यांचे सचिव भूपति मंडल यांनी म्हटले आहे की, या निर्णयाने व्यापाऱ्यांना मोठे नुकसान होणार आहे. सध्या अडकून पडलेल्या ट्रक पुढे पाठवणे शक्य नाही. लवकरच निर्णय न झाल्यास तो कांदा ट्रकमध्ये खराब होण्याचीही भीती आहे.

  संपादन : सचिन मोहन चोभे

  ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

  Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here