निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका, वास्तवात ग्राहकांना फायदाच नाही; म्हणून कांद्याचे भाव येईनात खाली..!

कांदा या जीवनाश्यक नसलेल्या मात्र राजकीयदृष्ट्या खूप प्रभावी असेलल्या पिकाच्या निर्यातीला बंदी घालण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कांद्याचे भाव १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आलेले आहेत. मात्र, वास्तवात शहरी भागात याचा कोणताही फायदा ग्राहकांना मिळत नसल्याचे चित्र आहे.

सध्या महाराष्ट्रात १२ ते १८ रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा दिल्ली येथील आझादपूर मार्केटमध्ये ४०-४५ रुपये दराने विकला जात आहे. मग दिल्ली आणि उत्तर भारतात तसेच दक्षिण भारतातही खांद्याचे भाव किरकोळ विक्रीत ५० ते ६० रुपये किलो इतके स्थिर आहेत. एकूणच केंद्र सरकारच्या निर्णयाने महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना अब्जावधीचे नकसान झालेले आहे. मात्र, व्यापाऱ्यांचा फायदा आणि ग्राहकांचे आणखी जास्त नुकसान झालेले आहे.

  आझादपूर मार्केटचे चेअरमन आदिल अहमद खान यांनी म्हटले आहे की, प्रमुख कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या भागात पावसामुळे शेतातील आणि साठवलेला असा ५० टक्के यापेक्षाही जास्त कांदा खराब झालेला आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये बाजारात याचे भाव कायम आहेत.

  एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे की, निर्णय कोणताही आणि कसाही होवो यामध्ये व्यापारी आणि दलालांच्या साखळीचे काहीही नुकसान होत नाही. यामध्ये शेतकरी आणि ग्राहक यांचेच मरण होते. ग्राहकांना फायदा देण्यासाठी घेतलेल्या निर्णयाद्वारे सरकारने थेट व्यापाऱ्यांना अच्छे दिन दाखवल्याची टीका उत्पादक शेतकरी करीत आहेत.

  संपादन : सचिन मोहन चोभे

  स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

  Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here