‘त्या’ महत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते व भाजप नेत्यांमध्ये जुंपली; वाचा काय घडलाय प्रकार

मुंबई :

सध्या देशाच्या राजकारणात महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी हे ३ मुद्दे ट्रेंडमध्ये आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून सध्या अनेक प्रश उपस्थित केले जात आहेत. अशातच शिवसेना ब भाजप नेत्यांमध्ये ट्वीटरवर राजकीय युद्ध चालू झाले आहे. भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ‘युवराजाच्या हट्टा लपायी महापालिकेत ‘मराठी’चा गेम’ असे म्हणत शिवसेनेवर आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. यावरून शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी भातखळकरांना चांगलेच सुनावले.

जाधव म्हणाले की, अहो भातखळकर, तुमचे मुंबई अध्यक्ष “लोढा”, तुमचे माजी गटनेते “कोटक”, तुमच्या काळात मुख्य सचिव “मदान”, तुमचे किती नगरसेवक मराठी? किती आमदार मराठी?  मराठीचे धडे शिवसेनेला नका शिकवू. आमचे रक्तच मराठी आहे.   

नेमकं काय म्हणाले होते भातखळकर :-

युवराजाच्या हट्टा लपायी महापालिकेत ‘मराठी’चा गेम… शुभांगी सावंत यांच्यासह दोन सीनियर मराठी अधिकाऱ्यांचा ज्येष्ठता क्रम डावलून संगीता शर्मा यांच्या गळ्यात महापालिका चिटणीसपदाची माळ. मराठी माणसाचा बेगडी आणि सोयीस्कर पुळका दाखवणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा चेहरा उघड…

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here