अन्नपूर्णा योजनेतून मिळणार १ रुपयात गहू, तांदूळ आणि मीठ; वाचा महत्वाची बातमी

अन्नपूर्णा नावाच्या नव्या योजनेतून गरिबांना फ़क़्त १ रुपये इतक्या दराने गहू, तांदूळ आणि मीठ देण्याची योजना तयार झालेली आहे. प्रत्येक लाभार्थ्यास प्रतिमाही ५ किलो इतके अन्नधान्य या योजनेतून मिळणार आहे.

अशा पद्धतीने 37 लाख गरीब कुटुंबाना जगण्याचा अधिकार देण्याची योजना मध्यप्रदेश सरकारने बनवली आहे. गरिबांना हक्काचे अन्न मिळण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. अन्न उत्सव याची सुरुवात करताना मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी या योजनेची माहिती दिली.

  २००८ पासून ही योजना चालू आहे. त्यात आता फ़क़्त १ रुपयात अन्नधान्य देण्याची माहिती त्यांनी दिली. तसेच गरिबांना पुढील ३ वर्षांमध्ये हक्काचे घर आणि सरकार सभल योजना याद्वारे शिक्षणाचा अधिकार मिळणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या योजनेचा आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अन्नधान्य कोट्याच्या व्यतिरिक्त हे अन्नधान्य देण्याची तयारी मध्यप्रदेश सरकारने केली आहे.

  संपादन : माधुरी सचिन चोभे

  ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

  Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here