भाजप प्रवक्त्यांनी पंतप्रधान मोदींना ‘अशा’ दिल्या शुभेच्छा; ‘त्यांना’ हाणला टोला, स्वत: झाले ट्रोल

मुंबई :

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध अर्थाने मोदींना शुभेच्छा दिल्या जात आहेत. भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ‘ना आजोबांच्या जीवावर ना बापाच्या जीवावर स्वतःच्या स्वकर्तृत्वावर 17 वर्ष मुख्यमंत्री पद मिळणारे… त्यानंतर स्वतःच्या स्वकर्तृत्वावर दोन वेळा स्पष्ट बहुमत घेऊन हिंदुस्थानचे दुसऱ्यांदा पंतप्रधान होणारे… श्री नरेंद्रभाई मोदी यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा’, असे म्हणत मोदींना शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छा देताना त्यांनी खोचक शब्दात ठाकरेंवर टीकाही केली. परंतु नंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. अवधूत वाघ यांच्या ट्वीटवर विविध अंगी प्रतिक्रिया आल्या आहेत. विराज बावकर यांनी म्हटले आहे की, स्वत:च्या घरच्यांच्या जिवावर एकदा नेता मोठा झाला तर गैर काय? नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकीय जीवनात किती जनांचे पाय धरले आहेत ते बघा. मोदी यांच्या बद्दल काय करायचे यांचे निर्णय भाजप वाले बाळासाहेबांना विचारून घेत होते.

राज पाटील यांनी म्हटले आहे की, ना आजोबांच्या जीवावर ना बापाच्या जीवावर स्वतःच्या स्वकर्तृत्वावर 17 वर्षा पासून सतरंजी उचलणारे त्यानंतर स्वतःच्या स्वकर्तृत्वावर दोन वेळा स्पष्ट बेडशीट व गादी घेऊन हिंदुस्थानचे दुसऱ्यांदा गादी उचले होणारे… श्री अवधूत भाई सतरंजी वाले गादी सम्राट भक्तच्या खूप शुभेच्छा.

रुपेश यांनी म्हटले आहे की, यांना वाचवला कोणी?? आमच्या साहेबांनी… नाहीतर अडवाणी, अटल बिहारी वाजपेयीजी आले होते काटा काढायला यांचा मातोश्रीवर …पण बाळासाहेबांनी वाचवला यांना…त्यामुळे जास्त उसळू नये उगाच. स्वतःला पक्षात कोणी विचारत नाही त्याच बघा जरा. स्वतःच कमवा स्थान काहीतरी पक्षात.

अवधूत वाघ यांना नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. खोचक शब्दात शिवसेना आणि ठाकरेंवर टीका करण्याची आयडिया त्यांना महागात पडली आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here