आणखी एक भारतमित्र चीनच्या फासात; कर्जाच्या ट्रॅपमध्ये अडकला शेजारी देश

एकेकाळी भारतमित्र आम्हून ओळख असलेला आणि आता पूर्णपणे चीनच्या कह्यात गेलेल्या मालदीव या देशावर चिन्यांनी आपला फास आवळला आहे. मोठ्या प्रमाणात घेतलेले कर्ज परत करण्यात अडचणी असल्याने या देशावर आता चीनचे वर्चस्व प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.

बेल्‍ट अँड रोड प्रॉजेक्‍ट याच्या नावाखाली चीनने जगभरात १५० पेक्षा जास्त देशांना कर्ज वाटले आहे. चीनच्या बँकांनी भारतालाही कर्ज दिल्याचे उघड झालेले आहे. एकूणच भारताला दिलेले कर्ज खूप छोटे आहे. मात्र, इतर देशांना मोठे कर्ज देऊन चीनने फास टाकला आहे. श्रीलंका या शेजारील देशालाही भारतापासून तोडण्यात चीनला यश आलेले आहे. त्यातच आता मालदीव या आपल्या शेजारच्या देशाने कर्ज देण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे हा देश डिफॉल्टरच्या यादीत जाण्याची भीती आहे.

  हा देश क्षेत्रफळाने छोटा आहे. त्यांची एकूण अर्थव्यवस्था ५ अरब डॉलर इतकी आहे. त्यातील ३.५ अरब डॉलर हे चिन्यांनी कर्ज दिलेले आहेत. त्यामुळे एकूण अर्थव्यवस्था आणि कर्जाची टक्केवारी लक्षात घेता त्या देशासाठी ही धोक्याची घंटा आहे. या देशाची अर्थव्यवस्था ही पर्यटन केंद्रित आहे. करोनाच्या काळात त्या देशाला मोठा झटका बसला आहे. यंदा या देशाला तब्बल ७० करोड डॉलर इतका फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे चिन्यांचे कर्ज देणे त्यांच्यासाठी मोठे जिकीरीचे काम बनले आहे.

  चीनचे समर्थक असलेल्या अब्‍दुल्‍ला यामीन यांच्या सरकारने २०१३ मध्ये मोठ्या प्रमाणात विकासाभिमुख प्रकल्प राबवण्याच्या नावाखाली हे कर्ज घेतले. मात्र, आता त्यामुळे देश संकटात आल्याचे माजी पंतप्रधान मोहम्‍मद नशीद यांनी म्हटले आहे. एकूणच चीनने मालदीवची परिस्थिती थेट श्रीलंकेसारखी करून टाकल्याचे त्यांनी बीबीसी वार्ताहराशी बोलताना म्हटले आहे.

  संपादन : सचिन मोहन चोभे

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here