ब्रेकिंग : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल; वाचा काय घडलाय प्रकार

मुंबई :

कोव्हीड केअर सेंटरमध्ये अनेक फसवणूक व गैरप्रकारच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशातच मृतदेहांची बदली केल्याचे प्रकरण चर्चेत आहे. मृतदेहांच्या अदलाबदली प्रकरणात आंदोलन करणारे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत सांगितली.

पाटील म्हणाले की, मृतदेहांच्या अदलाबदली प्रकरणात आंदोलन करणारे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य सरकार फोफावलेल्या कोव्हीडकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे.

सत्यासाठी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबू पाहत आहे. राज्य शासनाची ही मुजोरी चालू देणार नाही, असे म्हणत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली.

पाटील यांनी केलेल्या ट्वीटवर काही मोजक्या प्रतिक्रिया आल्या आहेत. समाधान पाटील यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षण आंदोलन चालु असताना किती मराठा  तरुणांवर गुन्हे नोंद झाले ? एकही वक्तव्य नाही केलात तुम्ही !

आशिष कदम यांनी म्हटले आहे की, दादा GDP आणि बेरोजगारीबद्दल बोला कधी तरी…

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here