कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर; ‘या’ भाजप नेत्याची जळजळीत टीका

मुंबई :

भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा नव्या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुंबई, ठाणे, पुणे शहरातील बिल्डरांसाठी राज्य शासन प्रिमीयम कमी करण्याचा घाट घालत आहे. त्यासाठी पारेख कमिटी गठीत करण्यात आली आहे.

पण… प्रिमीयम कमी केल्याने महापालिकांचे उत्पन्न घटणार त्याचे काय? सर्वसामान्यांसाठी घराच्या किंमती कमी होणार का?त्या किती कमी होणार? असे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले.

पुढे बोलताना त्यांनी राज्य सरकारला शेतकऱ्यापेक्षा बिल्डरांच्या विषयात या सरकारला रस असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, रेडिरेकनरची फाईल जशी पुणे-मुंबई प्रवासात “लक्ष्मी दर्शन” करीत आली तशीच ही फाईल मंत्रालयातून कुठल्या कुठल्या “बंगल्यावर लक्ष्मीदर्शन” करीत फिरतेय? शेतकरी, श्रमिकांच्या प्रश्नांपेक्षा बिल्डरांच्या विषयात सरकारला अधिक रस का?

‘राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर’, असे म्हणत त्यांनी मविआ सरकारवर जोरदार टीका केली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here