राज्यसभेत राऊत कडाडले; ते काय ‘भाभाजी के पापड’ खाऊन बरे झाले का?

दिल्ली :

गेल्या काही दिवसांपासून कोरोना हाताळण्यात अपयश आले म्हणून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत महाराष्ट्र सरकारची बाजू मांडली. ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेनेही मुंबई महापालिकेच्या कामाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या प्रत्येकाने या गोष्टी लक्षात घ्याव्या.

पुढे त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सदस्यांना मला विचारायचं आहे की एवढे लोक कसे काय बरे झाले? ते काय ‘भाभाजी के पापड’ खाऊन बरे झाले का? ही राजकीय लढाई नसून लोकांचे जीव वाचण्याची लढाई आहे.

काय आहे ‘भाभाजी के पापड’ प्रकरण :-

काही दिवसांपूर्वी एका खासदाराने ‘भाभाजी के पापड’ नावाचे पापड लौन्च करत हे पापड खाल्ल्यावर रोगप्रतिकारक क्षमता वाढते, असा दावा केला. मात्र काही दिवसांनी हे खासदारच करोनाबाधित असल्याचे समोर आले.

हाच मुद्दा लक्षात घेत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. पुढे ते म्हणाले की, माझी आई आणि भावालाही करोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात अनेक लोक करोनातून बरे होत आहेत. धारावीतील परिस्थितीही नियंत्रणात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही मुंबई महापालिकेच्या कामाचं कौतुक केलं आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here