मनसेने पुन्हा समोर आणला ‘तो’ व्हिडीओ; सरकारवर केला हल्लाबोल

मुंबई :

सध्या अनलॉकची प्रक्रिया चालू आहे. कोरोना होऊ नये म्हणून राज्य व केंद्र सरकारने सामजिक जीवनात अनेक नियम व बंधने घातलेली आहेत. काही ठिकाणी हे नियम पाळले जात नाहीयेत तर काही ठिकाणी नियम लागू केलेले नाहीत. रेल्वेमध्ये मात्र अगदी कडक वातावरणात नियम पाळले जात आहेत. बसमध्ये मात्र असे कुठलेही नियम पाळले जात नाहीत. एकदम खचून गर्दी असतानाही बसमध्ये कुठलेच सामाजिक अंतर ठेवले जात नाही. हीच बाब लक्षात घेऊन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत बसच्या गर्दीत करोना होत नाही पण रेल्वे च्या गर्दीत होतो असा सरकारचा समज आहे का??, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

देशभरात व प्रामुख्याने महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. अशा काळात जास्त काळजी घेणे गरजेचे असताना सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी नियम लागू करणे गरजेचे आहे.

देशपांडे यांच्या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. मनसे कार्यकर्ते पारस डुकरे यांनी म्हटले आहे की, मॉलमध्ये कोरोना शिरत नाही, पण मंदिरात शिरतो ? उद्धवा अजब तुझे सरकार.

केंद्र व राज्य सरकारने समन्वय ठेवून काही गोष्टी लवकरात लवकर करण्याची नितांत गरज आहे, अशाही आशयाच्या अनेक प्रतिक्रिया या ट्वीटवर आलेल्या आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here