दुग्धोत्पादाकांसाठी अनुदान : ‘त्या’ योजनेतून मिळणार तातडीने कर्ज; वाचा महत्वाची बातमी

दुध उत्पादकांना किसान क्रेडीट कार्ड योजना महाराष्ट्र शासनाच्या दुग्धव्यवसाय विकास विभागातर्फे लागू करण्यात आलेली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना तातडीने ३ लाख रुपये कर्ज देण्यात येणार आहे.

याबाबतचे एक परिपत्रक शेतकरी सुनील शिंदे (श्रीरामपूर) यांनी पाठवले आहे. त्यात या योजनेचे डीटेल्स देण्यात आलेले आहेत. त्यात म्हटले आहे की, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक सहकारी दुध उत्पादक संस्थेतील सभासद आणि खासगी दुध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

अनुदान व कर्ज योजना..👍

Posted by कृषीरंग on Wednesday, September 16, 2020

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकारी संस्थेचे सचिव किंवा दुध संकलन करणार्यांकडे यासाठी संपर्क साधावा. कर्ज मागणीचे अर्ज तातडीने जमा करावेत. दि. ३० सप्टेंबर २०२० ही यासाठीची अंतिम मुदत आहे. किसान क्रेडीट कार्डद्वारे दुध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या नजीकच्या बँकेत याद्वारे ३ लाख रुपये कर्ज मिळेल. याचा व्याजदर फ़क़्त ३ टक्के इतका असेल. तसेच नियमितपणे कर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांना याद्वारे २ टक्के अतिरिक्त व्याज अनुदान देण्यात येईल.

अर्जासोबत लागणारी कागदपत्र अशी :

 • आधार कार्ड
 • बँक पासबुक झेरोक्स
 • पासपोर्ट दोन फोटो
 • सात-बारा व आठ अ उतारे
 • यापूर्वी पीककर्ज घेण्यासाठी किसान क्रेडीट कार्ड घेतलेले असल्यास त्याचा तपशील

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नजीकचा दुध संघ किंवा प्रकल्प यांच्याकडे संपर्क करावा. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी 0241 2778984 यावर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी आणि दुग्ध सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. देशभरात ही योजना लागू असून देशातील १.५ कोटी शेतकऱ्यांना याद्वारे लाभ देण्याचे नियोजन आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here