म्हणून ‘हे’ शेअर देऊ शकतात आज पैसे; पहा कोणते असतील ते

मागील सलग दोन दिवस भारतीय शेअर बाजार वाढत आहे. अशावेळी अमेरिकन फेडरल रिझर्व यांनी पुढील कालावधीत व्याजदर कमी ठेवण्याचे सुतोवाच केल्याने जागतिक बाजारात तेजी दिसण्याची चिन्हे आहेत. त्यातच भारतीय बाजारातही तेजी दिसण्याचा अंदाज आहे.

अशावेळी भारतीय शेअर बाजारात टाटा स्टील, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी आणि अदानी इंटरप्राईजेस या तीन कंपन्यांमध्ये चांगली ग्रोथ होऊ शकते असे नवभारत टाईम्स यांच्या बातमीत म्हटले आहे. टाटा स्टील कंपनीला नवीन संसद बांधण्याचे ८६१.९ कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. तर, या कंपनीने आपल्या कामगार संघटनेशी संवाद करून मागील आर्थिक वर्षात २३५ कोटी इतका बोनस देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा शेअर बाजारात भाव खाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  यासह डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांना The Russian Direct Investment Fund (RDIF) यांनी भारतात Sputnik V या करोना लसचे क्लीनिकल ट्रायल आणि डिस्ट्रीब्यूशन यासाठी सहकार्य करार केलेला आहे. त्यामुळे या कंपनीकडून इन्व्हेस्टर मंडळींना चांगला लाभ होण्याची अपेक्षा आहे. तसेच सहा विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर देशातील गजबजलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या नवी दिल्ली स्थानकासाठी बोली लावणाऱ्या अदानी इंटरप्राईजेस यांच्या शेअरमध्येही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

  संपादन : सचिन मोहन चोभे

  ता.क. : शेअर बाजारातील गुंतवणूक ही स्वतः:चा अभ्यास करून करावी. कोणत्याही कंपनींच्या बातमीवर लगेच विश्वास ठेऊन गुंतवणूक करू नये. ही माहिती फ़क़्त रेफरन्ससाठी वापरावी.

  होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

  Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here