ब्लॉग : मोदी नावाचा ‘इतिहास पुरुष’..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने ट्विटर आणि फेसबुकवर सध्या मोदीजी ट्रेंडमध्ये आहेत. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार भारतकुमार राऊत सरांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शुभेच्छा देताना पुढील लेख लिहिला आहे. आम्ही हा लेख जसाच्या तसाच प्रसिद्ध करीत आहोत.

‘मी नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूॅं…’ धीरगंभीर आवाजात राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी २६ मे २०१४ रोजी शपथग्रहण करत होते… त्यांनी भारतात ‘रक्तविरहीत क्रांती’ घडवून आणली होती. देशातील काॅंग्रेसची सत्ता लीलया उलथवून भाजपने एकहाती सत्ता आली होती. मोदी पंतप्रधान बनले होते. याच इतिहासाची पुनरावृत्ती त्यांनी २०१९मध्येही करून दाखवली. आता त्यांच्या पंतप्रधानपदाची सहा वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. रस्त्याच्या कडेला टपरीत चहा विकण्याचे काम करणारा तरुण पुढे देशाचा पंतप्रधान होतोच, शिवाय जगातील पहिल्या दहा सर्वात प्रभावी नेता बनण्याची किमया करून दाखवतो; हा ‘चमत्कार’ करून दाखवणारे नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस. करोडो भारतीयांच्या वतीने त्यांना दीर्घायु आरोग्य लाभो, ही शुभेच्छा!

मोदी यांचा जन्म १९५० साली आजच्याच दिवशी झाला. सुरुवातीला वडिल व भावाबरोबर चहा विकणाऱ्या मोदींनी नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पदवी मिळवली. त्याच काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल होऊन पूर्ण वेळ प्रचारक बनले. संघकार्याचा एक भाग म्हणूनच ते भारतीय जनता पक्षात सरचिटणीस झाले. २००१ ते २०१४ या काळात ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. २०१४ ची लोकसभा निवडणूक त्यांच्या एकहाती प्रयत्नांमुळेच भाजपाने निर्विवादपणे जिंकली. त्यामुळेच २६ मे २०१४ रोजी त्यांचा १५ वे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.

संघाच्या प्रचारकाला पंतप्रधान होण्याची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ. स्वतंत्र भारतात जन्मून पंतप्रधान होणारे मोदी पहिलेच. गेल्या सहा वर्षांत मोदींनी काय कमावले, काय गमावले, त्यांचे व भाजप सरकारचे काय भवितव्य? या आणि अशा विषयांवर सतत चर्चा व विवाद चालूच आहे. आज त्या विषयांमध्ये आज शिरण्याचे कारण नाही.

आज नरेंद्रभाई मोदींना Happy Birthday! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

संपादन : टीम कृषीरंग

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here