वीज ग्राहकांना मिळणार ‘हे’ महत्त्वपूर्ण अधिकार; पहा नव्या मसुद्याची काय असेल कमाल

केंद्रींय विद्युत मंत्रायालयाने नवीन विद्युत ग्राहक यांचे अधिकार नियमावली बनवण्याची तयारी केली आहे. याद्वारे ग्राहकांना काही खास अधिकार मिळणार आहेत. सरकारने याबाबतचा मसुदा प्रसिद्ध केला असून त्यावर आपण कोणीही ३० सप्टेंबर २०२० पर्यंत आपल्या सूचना नोंदवू शकता.

यामध्ये ग्राहकांना मिळणारे काही अधिकार आणि नियमावली अशी :

 • १० किलोवॅटपर्यंतचे वीज कनेक्शन घेण्यासाठी साधे फ़क़्त दोन प्रकारचे पुरावे चालतील.
 • कागदपत्र जमा केल्यावर महापालिका क्षेत्रात ७ दिवस, नगरपालिका क्षेत्रात १५ दिवस आणि ग्रामीण भागात ३० दिवसात ग्राहकांना वीजजोडणी मिळेल.
 • १००० रुपये यापेक्षा जास्तीचे वीजबिल फ़क़्त ऑनलाईन पद्धतीने घेतले जाईल.
 • प्रत्येक वीज कंपनीला आपली ग्राहक तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करावी लागेल. ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना तक्रार करता येईल.
 • बिल जर वेळेत दिले नाही, आणि एकाचवेळी जर जास्तीचे बिल देण्यात आले तर अशावेळी ग्राहकांना कमीतकमी ५ टक्के किंवा राज्याच्या विद्युत नियामाकांनी ठरवून दिलेल्या पद्धतीने सूट मिळेल.

अशा पद्धतीने नियमावली देतानाच आता यापुढे कोणत्याही कंपनीला महिन्यात आणि वर्षभरात नेमकी कितीवेळा लाईट घालवली जाईल याचेही वेळापत्रक देऊन ठेवावे लागेल. त्यानुसार ग्राहकांना जास्त प्रमाणात विद्युत पुरवठा बाधित करून डोकेदुखी होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

एकूणच अशा पद्धतीचे बदल होतानाच विजेची चोरी रोखणारी यंत्रणा मग कंपन्याही ठोसपणे कार्यान्वित करतील. अशावेळी मग दोन्ही बाजूने सहकार्य करूनच हा ड्राफ्ट कार्यान्वित होईल असे दिसते.

संपादन : सचिन पाटील

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here