पुन्हा एकदा त्या कृतीतून दिसले टाटांचे मोठेपण; ऐन लॉकडाऊन मध्येही केले ‘हे’ कौतुकास्पद काम

दिल्ली :

निव्वळ संपत्तीनेच नव्हे तर मनानेही मोठे असणारे भारतीय उद्योजक म्हणजे टाटा कुटुंबीय होय.  आजवर अनेकदा रतन टाटा यांचे मनाचे मोठेपण नेहमीच आपल्यासमोर त्यांच्या वेगवेगळ्या कृतीतून आले आहे. आजही एक अशीच गोष्ट घडली आहे ज्यामुळे ररतन टाटांचे सोशल मिडीयावर कौतुक चालू आहे. मराठीत एक म्हण आहे ‘ज्याचं खावं मीठ त्याचं नेहमीच करावं नीट’ ‘देश का नमक टाटा नमक’ असं म्हणत नेटकरी आज रतन टाटांचे कौतुक करत आहेत. करोनाच्या या संकटकाळात टाटांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये घरी असतानाहीपगार तर दिलेच पण आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी आता भरघोस दिवाळी बोनसही जाहीर केला आहे.   

टाटांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक चालु आहे. एका बाजूला नोकरकपात करणाऱ्या कंपन्या आहेत तर दुसऱ्या बाजूला रतन टाटांसारखी मोठ्या मनाची आणि दर्यादिल माणसे आहेत. यापूर्वीही रतन टाटांनी तब्बल १५०० कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहायता निधीसाठी देऊ केली होती. टाटा स्टील, जमशेदपूर युनिट डिव्हीजन कालींगानगर युनिट आणि इतर सर्व कंपन्यांनाही बोनस दिला गेला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी कमर्चारी कपात करणाऱ्या कंपन्यांवर टाटा भडकले होते. ज्यांच्या जीवावर कंपनी मोठी होते, त्यांना बिनपगारी घरी बसवणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. आज पुन्हा एकदा टाटांच्या माणुसकीचे दर्शन घडले असून टाटांच्या या निर्णयामुळे आपण खुश असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here