‘या’ कंपनीत मिळतेय रोजगाराची संधी; ७० हजार जॉब होणार उपलब्ध

मुंबई :

जगभरात कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे सगळीकडे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. उद्योग-धंद्यांची वाताहात सुरु आहे. नव्याने सुरु झालेले बिझनेस बंद पडले आहेत. लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. या वैश्विक अर्थ संकटावर मात करताना सगळ्यांच्या नाकी नऊ आलेले आहेत. अर्थचक्राची गणिते फिस्कटली असताना फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीने तब्बल ७० हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा संकल्प केला आहे.

देशभरात आपला व्यवसाय विस्तारण्याच्या हेतून फ्लिपकार्टने अनेक नव्या संकल्पना समोर आणल्या आहेत. ५० हजार किराणा दुकानांनाही आपल्यासोबत घेऊन पुढे काम करण्याचे फ्लिपकार्टने सांगितले आहे. जगभरात सर्वच व्यवसायांची अत्यंत बिकट परिस्थिती असताना फ्लिपकार्टने ७० हजार रोजगारनिर्मिती करण्याचे ठरविले आहे.

कोरोनामुळे थेट बाजारात जाऊन वस्तू विकत घेणे लोक टाळत आहेत. परिणामी ऑनलाईन मार्केट तेजीत आहे. त्याचाच फायदा ई-कॉमर्स कंपन्या घेत आहेत. अशातच काही दिवसांनी सणासुदीचे दिवस चालू होतील, हीच गोष्ट लक्षात घेऊन ई- कॉमर्स कंपन्या आपल्या व्याप वाढवत आहेत.

या ७० हजार रोजगारांमध्ये डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, पिकर्स, पॅकर्स आणि सॉर्टर्स या प्रकारच्या रोजगांराचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. या रोजगारांमुळे संलग्न होणाऱ्या दुकानांतूनही अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे, अशी माहिती फ्लिपकार्टने दिली आहे.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here