ब्रेकिंग : म्हणून रशियानेही पाकिस्तानला झाडले; पहा कुठे घडलाय तो प्रकार

शंघाई सहयोग संगठन (एससीओ अर्थात SCO) यांच्या बैठकीत पाकिस्तानने भारताची खोडी काढण्यासाठी म्हणून एक काल्पनिक आणि बनावट नकाशा सदर केला. त्यावर संतप्त झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी ही बैठक सोडून आपण आणि संपूर्ण भारत देश यावर नाराज असल्याची प्रतिक्रिया कृतीतून व्यक्त केली आहे. त्यावर रशियाने पाकिस्तानला असे कृत्य करणे चुकीचे असल्याचे म्हणत फटकारले आहे.

  चीन आणि पाकिस्तानने मिळून त्या बैठकीत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. विदेश मंत्रालय यांचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने त्या बैठकीत बोगस नकाशा प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने मागील महिन्यापासून असा बोगस नकाशा प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. बैठकीतही त्यांनी तोच प्रयत्न करून पाहिला. मात्र, भारताने आपली स्पष्ट नाराजी बैठकीत उपस्थित देशांना दाखवून दिली आहे. 

  मात्र, त्यांनी कोणत्या देशाने त्यावर काय प्रतिक्रिया दिली हे म्हटले नाही. नवभारत टाईम्स या आघाडीच्या दैनिकाने आतल्या गोटातील सूत्रांच्या हवाल्याने रशियाने पाकिस्तानला फटकारल्याचे म्हटले आहे.

  संपादन : सचिन मोहन चोभे

  स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

  Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here