बायपास झाली असतानाही ‘या’ साहित्यिकाने वयाच्या ८९व्या वर्षी केली कोरोनावर मात

अहमदनगर :

जगण्याची इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टीकोन आणि योग्य उपचार याच्या मेळ साधला तर कोरोनावर मात करणे शक्य आहे, असे कोरोनामुक्त झालेले पेशंट सांगत असतात. आजकाल अनेक वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा कोरोनावर मात करत आहेत. अशातच वयाच्या ८९ व्या वर्षी जेष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यापूर्वी त्यांच्यावर बायपास शस्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना अंधेरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता ते कोरोनामुक्त झाले असून आता ते घरी परतले आहेत.

आज महाराष्ट्रातील घराघरात त्यांचे नाव पोहोचलेले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक म्हणूनही त्यांची ओळख आहे. कोरोनाची बाधा होण्यापूर्वी कर्णिक यांनी ‘प्राप्तकाल’ नावाची एक कादंबरी लिहायला घेतली होती. आता कोरोनामुक्त झाल्यावर ‘आता ही कादंबरी आपण पू्र्ण करू’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान कर्णिक यांच्या कुटुंबीयांनी विनंती केली आहे की, आणखी एक महिनाभर त्यांना कुणी संपर्क करू नये.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here