अमेरिकेतही भारतीय स्टाईलने होतेय निवडणूक; भारतीयांच्या मतांवर आहे दोघांचीही नजर

निवडणूक कोणतीही असो त्यात खरे कमी आणि खोटे जास्त अशी भेसळ करणारच विजयी होतो. सगळीकडे हेच सूत्र आहे. कारण, बहुसंख्य मतदारच खऱ्या भावनेचे नसल्यावर नेते तरी दुसरी कोणती पद्धत निवडणार म्हणा. अमेरिका या महासत्ता असलेल्या देशातही सध्या तोच ट्रेंड आहे. भारतीय हिंदू मतांना चुचकारण्यासाठी तिथेही वेगवेगळे डावपेच खेळले जात आहेत.

ग्रीन कार्ड हा मुद्दा आपणच निर्माण करून तसे काहीही करणारा नसल्याचे भासवत सध्या रिपब्लिकन पार्टीचे असलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतीय मतदानाला साद घालीत आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीचे गोडवेही ट्रम्प यांची टीम गात आहे. त्याचवेळी डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन हेही हिंदूंना मतदानासाठी साद घालीत आहेत. कमला हॅरिस यांना बायडेन यांनी उपाध्यक्ष या पदावर उमेदवारी दिली आहे. त्या भारतीय-आफ्रिकन-अमेरिकन आहेत.

  आपल्याकडे नाही का ग्रामपंचायत निवडणुकीत आपणच रस्ता अडवून किंवा रस्त्यात गटार करून ठेऊन समस्या निर्माण करायची आणि त्याच जीवावर सरपंच व्हायचे. तसाच किंवा अनेकदा एखाद्याच्या भावकीत उमेदवारी देऊन मतदारांना आकर्षित करतो तोच प्रकार अमेरिकन निवडणुकीत खेळला गेलेला आहे. दोन्ही बाजू यात कमी नाहीत. मात्र, विचारी प्रचार करण्यात बायडेन खूप कमी पडत आहेत. बायडेन देशाच्या महत्वाच्या मुद्यांवर बोलत आहेत. त्यावर उत्तर शोधण्यासाठीच्या प्रयत्नांसाठी निवडणूक लढत असल्याचे म्हणत आहेत

  तर मागील निवडणुकीत रशियावर तोंडसुख घेताना रशियाच्या मदतीने निवडणूक जिंकलेले ट्रम्प यंदा चीनच्या पाठीमागे लागले आहेत. त्यांचे निकटवर्तीय ट्रम्प हे यंदा चीनच्या मादातीने निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज झाल्याचे म्हणत आहेत. एकूणच ही निवडणूक मुद्द्यावर नाही तर भीती आणि भावनिक मुद्द्यांवर नेण्यासाठीचा प्रयत्न ट्रम्प करीत आहेत.

  संपादन : सचिन मोहन चोभे

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here