WhatsApp मध्ये आलंय ‘हे’ मस्त आणि रंजक फिचर; वाचा अधिक

मुंबई :

आपल्या ग्राहकांना जोडून ठेवण्यासाठी माहिती आणि मनोरंजन क्षेत्रात प्रत्येक application नवनवीन कल्पना लोकांपर्यंत पोहोचवत असतात. लोकांना आपल्या applicationमध्ये जास्तीत जास्त गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरल्या जातात. दर काही दिवसांना काहीतरी नवीन अपडेट दिले जाते. यात सर्वात जास्त यशस्वी कल्पना राबविणारे WhatsApp ने आणखी एक मस्त आणि भन्नाट फिचर आणले आहे. अँड्रॉयड बीटा अॅपमध्ये काही नवे आणि मस्त स्टिकर पॅक दिसले आहे. एवढेच नाही तर वॉलपेपर्समध्येही काही अफलातून बदल करण्यात आलेले आहेत, सदर माहिती लेटेस्ट रिपोर्टमधून समोर आली आहे.

WhatsApp Dimming असे या फिचरचे नाव असून व्हॉट्सअॅपमध्ये प्रत्येक चॅटसाठी वेगवेगळे वॉलपेपर लावण्याच्या फीचरवर काम सुरू असल्याचेही समजत आहे.

अशी आहेत या फिचरची वैशिष्ट्ये :-

  1. या फिचरमध्ये पांढऱ्या रंगाचे कार्टून आहे जे joy, anxiety, sadness, love यासारख्या अनेक भावनांसह(फीलिंग्स) येते.
  2. या फिचरमधील स्टीकर पॅकचे नाव Usagyuuun असे असून डिफॉल्ट स्टिकर लिस्ट मध्ये हा स्टिकर पॅक जोडलेला आहे.
  3. हे नवे स्टीकर पॅक Quan Inc या कंपनीने बनवले आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here