SCO च्या बैठकीत पाकिस्तानने केला खोटा नकाशा सादर; डोवल यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शंघाई सहयोग संगठन (एससीओ अर्थात SCO) यांच्या बैठकीत पाकिस्तानने भारताची खोडी काढण्यासाठी म्हणून एक काल्पनिक आणि बनावट नकाशा सदर केला. त्यावर संतप्त झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी ही बैठक सोडून आपण आणि संपूर्ण भारत देश यावर नाराज असल्याची प्रतिक्रिया कृतीतून व्यक्त केली आहे.

ऑनलाइन पद्धतीने या संघटनेच्या सर्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली. रशिया देशाने याचे निमंत्रण दिले होते. या संघटनेत कज़ाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उज़्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान हे देश सदस्य आहेत. तर, पर्यवेक्षक देश म्हणून अफगानिस्तान, बेलारूस, ईरान आणि मंगोलिया यांचाही समावेश आहे. त्याच बैठकीत पाकिस्तानने ही आगळीक केली आहे.

विदेश मंत्रालय यांचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने त्या बैठकीत बोगस नकाशा प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने मागील महिन्यापासून असा बोगस नकाशा प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. बैठकीतही त्यांनी तोच प्रयत्न करून पाहिला. मात्र, भारताने आपली स्पष्ट नाराजी बैठकीत उपस्थित देशांना दाखवून दिली आहे. मात्र, नंतर पाकिस्तानने त्यावर काय प्रतिक्रिया दिली. तसेच इतर देशांनी त्यावर काय म्हटले हे काही अजूनही स्पष्ट झालेले नाही.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here