राहुल गांधींनी ‘त्या’ मुद्द्यावरून मोदींना पुन्हा घेरले; विचारले ‘हे’ प्रश्न

दिल्ली :

भारत-चीन तणाव अद्यापही निवळलेला नाही. सीमेवर चीनच्या कुरापती चालूच आहेत. चीनच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी आजवर मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. परंतु केंद्र सरकारच्या बाजूने त्यांची कधीच उत्तरे आलेली नाहीत. भारत-चीन हा मुद्दा घेऊन पुन्हा एकदा राहुल यांनी हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांना घेरले आहे.

त्यांनी म्हटले आहे की,चीनच्या अतिक्रमणावरून मोदींनी देशाची दिशाभूल केली, असे संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. आपला देश भारतीय सेनेसोबत कायम होता, आहे आणि राहील.

‘पण मोदीजी, तुम्ही कधी चीनच्या विरोधात उभे राहाल? आपल्या देशाची जमीन चीनकडून परत कधी घेणार?’, असे सवाल राहुल गांधींनी विचारले आहेत. पुढे बोलताना त्यांनी मोदींना ‘चीनचे नाव घेण्यास घाबरू नका’, असा सल्लाही दिलेला आहे.

आजवर राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचे आणि प्रश्नांचे उत्तरे केंद्र सरकारकडून आलेली नाहीत. यावेळी तरी केंद्र सरकार कॉंग्रेसच्या प्रश्नांची उत्तरे देणार का? हाही प्रश्नच आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here