‘त्या’ दोन्हींच्या सेवनाने करोनावर मात करा; पहा काय म्हटलेय आरोग्य मंत्रालयाने

करोना विषाणू आणि त्यामुळे होणाऱ्या कोविड १९ आजारामुळे अवघे जग वैतागले आहे. त्यावरील उलटसुलट बातम्या, माहिती आणि अपडेट यामुळे अनेकांना नेमके काय करावे हेच समजेनासे झालेले आहे. अशावेळी भारत सरकारचा आरोग्य विभाग वेळोवेळी शास्त्रीयदृष्ट्या योग्य आणि परिणामकारक माहिती प्रसिद्ध करीत असतो.

आताही त्यांनी अशाच पद्धतीने करोना विषाणूची लागण झाल्यावर काय करून आपण त्या विषाणूला शरीरात मारू शकतो आणि लवकरच रिकव्हर होऊ शकतो याची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने यासाठी दोन घटक नियमितपणे पिण्याचे आवाहन केले आहे. देसःत सध्या दररोज ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. अशावेळी करोनान होण्यासह झालाच तर त्यापासून वाचण्यासाठी काळजी घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यासाठीच आरोग्य मंत्रालय खास सूचना आणि मार्गदर्शन करीत आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की, गरम पाणी आणि त्यात च्यवनप्राश टाकून पिणे हा एक उत्तम आणि सहजपणे करता येण्याजोगा उपाय आहे. हे दोन्ही घटक घेतल्याने कोणत्याही इतर आजारांपासून आपण दूर राहू शकतो. गरम पाणी पिल्याने शरीरातील घटक घटक असलेले टोक्सीन दूर होतात. तसेच च्यवनप्राश खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. तसेच या दोन्हींच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती अर्थात इम्युनिटी पॉवर वाढते.

संपादन : माधुरी सचिन चोभे  

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here