पुतीन यांना धक्का; अलेक्सेई नवलनी यांनी केली विषबाधेवरही मात, पहा काय म्हटलेय त्यांनी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या राज्यात सुरू असलेल्या सर्वच घडामोडीबाबत जगभरात संशय व्यक्त केला जातो. मुळात संशय व्यक्त करण्याजोग्या परिस्थिती त्यांनीच निर्माण केलेल्या आहेत. मागील महिन्यात पुतीन यांच्या रशियात विरोधातील नेते अलेक्सेई नवलनी यांना विषबाधा झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. मात्र, अलेक्सेई हे आता त्यातून बरे झालेले आहेत.

पुतीन यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक धोरणामुळे रशियाची कशी वाट लागली आहे. तसेच या हुकुमशाही नेत्यामुळे देश कसा संकटात येऊ शकतो याबाबतची मांडणी अलेक्सेई करीत असतात. त्यांना नोविचोक नावाचे खास विष देण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यांना रशियामध्ये योग्य उपचार मिळत नव्हते अशावेळी जर्मनीने त्यांना आपल्या देशात आणून उपचार करून बरे केले आहे.

जर्मन सरकारचे प्रवक्ते स्टीफन सीबर्ट यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अलेक्सेई यांना नोविचोक नावाचे विष देण्यात आल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध झालेले आहे. अलेक्सेई यांना २० ऑगस्ट २०२० रोजी हे विष देण्यात आलेले होते. पुतीन आणि त्यांच्या हस्तकांनीच देशातील एक तरुण नेता संपवण्याचा हा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अलेक्सेई आता बरे झाले असून त्यांनी इन्स्टाग्रामवर आपले फोटो टाकून आता श्वास घेण्यास अडचणी नसल्याचे म्हटले आहे. मी सगळ्यांना मिस करीत आहे. मात्र, लवकरच मी आपल्या भेटीला येऊ इच्छितो असेही अलेक्सेई यांनी लिहिले आहे. अनेकांनी यामुळे आनंद व्यक्त केला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here