सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये लडाखमधील पैगोंग झील भागात तणावाची परिस्थिती आहे. मुजोर चिन्यांना शाह देण्यासाठी भारतीय लष्कराने येथील मोक्याच्या ठिकाणावर अगोदरच आपकी पकड मजबूत करून ठेवली आहे. त्यातच आता चीनच्या मुद्यावर तोडगा निघत नसल्याने इंडियन आर्मीने संपूर्ण हिवाळा त्या भागात राहण्याची तयारीही पूर्ण केली आहे.
पैगोंग झील भागातील मोक्याच्या जागांसह संपर्ण सीमेवर भारतीय सैन्य तैनात आहे. चीनला अजिबात घुसखोरी करू न देण्याच्या तयारीसाठी म्हणून आता पुढील किमान ६ महिने या भागात ठिय्या मांडून राहण्याची तयारी भारतीय सैन्याने पूर्ण केली आहे. त्यासाठी प्रत्येक सैनिकाला लागणाऱ्या किमान १ लाख २० हजार रुपयांच्या सुविधा पाठवण्यात आलेल्या आहेत. कडक हिवाळ्यातही सीमेवर चीनला रोखण्यासाठी म्हणून ही तयारी करण्यात आलेली आहे.
भारतीय सैन्याला लागणारे खास अन्न, कपडे, शिधा, टेंट आणि हिटर अशी सगळी सोय करण्यात आलेली आहे. त्यातच आता पुढील महिन्यात या भागाला जोडणारा आणि वाहतूक वेगवान करण्यासाठी रोहतांग येथील बोगद्याचे कामही पूर्ण होईल. तसेच दिल्लीतून फ़क़्त दीड-दोन तासांमध्ये सैनिकांना हवाई मार्गाने मदत करण्यासाठीची तयारीही पूर्ण करण्यात आलेली आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे