चीन्यांनी ‘त्या’ देशावर आवळला फास; पहा कर्ज देऊन काय घेतलेय ताब्यात

चीन म्हणजे जगातील सर्वात मोठा सावकार देश बनला आहे. फ़क़्त सावकार नाही, तर क्रूर सावकार म्हणून या जगाची ओळख जगभरात होत आहे. जगातील किमान ७० टक्के म्हणजे १५० देशांना चिन्यांनी कर्ज वाटून तिथे आपले बस्तान किंवा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील एका देशाची तर चीन्यांनी थेट पॉवर ग्रीड अर्थात विद्युत पुरवठा करणारी लाईन ताब्यात घेतली आहे.

लाओस असे या देशाचे नाव आहे. चीनच्या शेजारी असलेला हा एक छोटा देश आहे. म्यानमार, थायलंड, चीन आणि व्हियेतनाम यांच्यामध्ये हा लाओस नावाचा देश आहे. या देशाने चीनकडून हाईस्पीड रेल कॉरिडोर बनवण्यासाठी ६ बिलियन डॉलर इतके कर्ज घेतले होते. त्याद्वारे या देशात राजधानीला जोडणारे खास रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. २ डिसेंबर २०२१ या दिवशी या कामाचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. मात्र, या कर्जासह इतर काही विकासाभिमुख कामांना त्या देशातील सरकारने घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे आता लाओसला अशक्य बनले आहे.

अशा परिस्थितीत त्या देशातील पॉवर ग्रीड हे शक्तिस्थान चीनी सरकारने ताब्यात घेऊन टाकले आहे. सध्या चीनने जगभरातील १५० देशांना किमान ११२ लाख ५० हजर कोटी इतके कर्ज वाटलेले आहे. त्याद्वारे हा देश जगभरात मुजोरी करीत आहे. लाओस देशाचे विदेशी मुद्रा भांडार १ बिलियन डॉलर यापेक्षाही कमी झालेले आहे. अडचणीत असलेल्या या देशावर कब्जा करण्यास आता चीन्यांनी सुरुवात केली असल्याचे हे लक्षण आहे. ‘डेट-ट्रैप डिप्लोमेसी’ याच्या खेळात आता लाओस हा देश अडकला आहे. या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे गोत्यात असल्याचे जुलै महिन्यात मुडीज या वित्त मानांकन संस्थेने म्हटले होते. त्याचे परिणाम आता दिसायला सुरुवात झालेली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे  

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here