धक्कादायक : राज्यातील ‘या’ मंत्र्यानाही आला धमकीचा फोन, ‘त्या’ संघटनेकडून फोन आल्याचा संशय

मुंबई :

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांना धमक्यांचे संदेश आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत तसेच ईतरही नेत्यांना धमकी मिळाली होती. हे धमकीसत्र अजूनही सुरूच आहे. अशातच उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन आला आहे. त्यांच्या पीएच्या मोबाईलवर हा धमकीचा कॉल आला असून ABVP च्या कार्यकर्त्यानं धमकीचा फोन केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

सध्या महाराष्ट्रात विविध घडामोडी घडत आहेत. त्यावरून अनेक वादही होत आहेत. दरम्यान सामंत यांनी म्हटले आहे की, मी अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही. विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करणार असल्याचाही विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे. या धमकीची तातडीनं तक्रार करणार असल्याचेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही अशाच प्रकारचा कॉल आला होता. आता भाजप आणि शिवसेनेचा हा सत्ता संघर्ष टोकाला गेला आहे.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here