इंडस्ट्री ‘बाबा’साहेब फाळकेंनी बनवली म्हणत कंगना झाली ट्रोल; पहा तिची नेमकी चूक

मुंबई :

सध्या कंगना विविध वादांमुळे चर्चेत आहेत. अशातच तिने एक वादग्रस्त वाक्य बोलून स्वतः ट्रोलच्या जाळ्यात अडकली आहे. चित्रपट निर्माता करण जोहर विषयी बोलताना तिने अरे तुरे ची भाषा वापरत चित्रपट इंडस्ट्री ही ‘बाबा’साहेब फाळकेंनी बनवली आहे, असे ट्वीट केले. चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आहेत. तिने चुकीचे नाव उच्चारल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

कंगनाने म्हटले होते की, ही इंडस्ट्री फक्त करण जोहर किंवा त्याचे वडिलांनी तयार केलेली नाही. बाबासाहेब फाळके यांच्यासह प्रत्येक कलाकार आणि कामगार यांनी तयार केलेली आहे. सीमेचे रक्षण करणारे सैन्य, घटनेचे रक्षण करणारे नेते, तिकीट खरेदी करणारे प्रेक्षक आणि कोट्यावधी भारतीयांनी ही इंडस्ट्री उभा केली आहे.

नेटकरी प्रतिक पाटील यांनी यावरून कंगनाला म्हटले आहे की, कंगनाताई ते बाबासाहेब नसून दादासाहेब फाळकेजी आहे. तू पण मोदींसारखी.. ते मोहनदास गांधीजी यांना मोहनलाल म्हणाले होते. तू का तसं करत आहेस.

आशिष पाटील यांनी म्हटले आहे की, पद्मश्री मिळाला आहे आणि नावसुद्धा माहिती नाही दादासाहेब फाळकेंचं…

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here