आज अभियंता दिनाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या ‘या’ इंजिनियर मावळ्याविषयी नक्कीच जाणून घ्या

शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्या मध्ये एक एक माणूस कर्तबगार होतो. पाचूच्या कोंदणात हिरा जसा शोभून दिसतो तशी शिवरायांच्या स्वराज्याचा राजधानी रायगड आजही शोभून दिसतो. याच सह्याद्री मधील आणि स्वराज्यातील किल्ला महाराष्ट्राच्या शिरपेखात एखादा तुरा खोवला गेलाय असा तोऱ्यात आजही भगवा झेंडा फडकत उभा ठाकलेला आहे. हा किल्ला कोणी बांधला माहीत आहे का ?

हा किल्ला बांधला “हिरोजी इंदलकर” नावाच्या एका गावठी इंजिनियर बांधला. कसले शिक्षण नाही की कसली पदवी नाही; पण ज्यांनी इंजिनियरिंग चे शिक्षण घेतले अशा कित्येक लोकांना रायगडाकडे पाहताना आपल्या इगो, मोठेपणा आजही बाजूला फेकून देऊन हिरोजी इंदलकर यांच्या विषयी अभिमान वाटतो की आपल्या क्षेत्रात असला कर्तृत्ववान माणूस होऊन गेला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांचं काम पाहून. त्यांच्यावर विश्वासाने कित्येक किल्ले बांधणीची जबाबदारी महाराजांनी सोपवली. रायगड किल्ला बांधत असताना महाराजांच्या आज्ञेनुसार प्रसाद, उद्याने, स्तंभ गजशाळा, नरेंद्र सदन अशा एक से बढकर एक वास्तू त्यांनी रायगडावर बांधल्या. बांधकाम झाल्यावर ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर आले. आणि त्यांनी हा किल्ला पाहिला तर ते बेहद खुश झाले. म्हणाले की हिरोजी हा रायगड तुम्ही बांधलात ?

हिरोजी इंदलकर म्हणाले की, जी महाराज मी बांधला !

छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की बोला हिरोजी इंदलकर काय हवं आहे तुम्हाला… आज आम्ही तुमच्यावर बेहद खुश आहोत..जे मागायचे ते मागा !

हिरोजी म्हणाले महाराज हवं ते द्याल ?

महाराज म्हणाले की होय, मागून तर पहा काय हवं आहे ते.

स्वराज्याशी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी लीन असणारे. हिरोजी म्हणाले की महाराज या रायगडाच्या वरील जगदीश्वराच्या पायरीवर,  एका पाषाणावर आमचं नाव कोरण्याची परवानगी द्यावी महाराज.

महाराज म्हणाले की परवानगी आहे हिरोजी !

महाराष्ट्रात शिवरायांनी कित्येक जलदुर्ग बांधले, किल्ले बांधले, भुईकोट किल्ले उभा केले पण एका विटेवर स्वतः चे नाव कधी शिवरायांनी टाकले नाही पण या निष्ठावंत, कर्तबगार एका इंजिनियर चे नाव महाराजांनी टाकायची परवानगी दिली. काय तो महाराजांचा मोठेपणा आणि काय ती हिरोजी यांची कर्तबगारी !

आजही रायगड त्याच तोऱ्यात उभा आहे ! इंजिनियर दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

लेखक : गणेश शिंदे सरकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here