महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून…; ‘या’ भाजप नेत्याची जळजळीत टीका

मुंबई :

आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून “छत्रपती शिवाजी महाराज” यांचं नाव देण्याचा स्तुत्य निर्णय उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने घेतला. महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तंस काही होईल वाटत नाही, असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीटरवरून निशाणा साधला.

यावेळी मराठा आरक्षण या विषयावरूनही राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, जवळपास ३/४ दिवस झाले तरी अजून महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका घेणार हे स्पष्ट करत नाहीये. आम्हाला अशोक चव्हाण यांचा कामाचा अनुभव आहे ते कधीच कुठलेही काम वेळेत करू शकत नाही व पूर्णत्वास नेऊ शकत नाही.. त्यावर मुख्यमंत्र्याचं काम शून्य. ह्यांना झटका द्यावाच लागेल.

त्यांच्या या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. ते म्हणाले की, कौस्तुभ यांनी विचारले आहे की, ज्यांना तुम्ही मुघल म्हणताय त्याच पक्षात राहून तुमचे पिताश्री मोठे झाले आहेत…म्हणजे तुमच्या वडिलांना काय म्हणायचं मग ??

कुमार चव्हाण यांनी राणे यांच्या ट्वीटला पाठींबा देत म्हटले आहे की, गेली २५ वर्षे दौलताबादचं नाव देवगिरी, औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव बदलायच्या आरोळ्या देणारे ठाकरे सरकार सत्तेत बसलेत. त्यांनी काय दिवे लावले? हे महाराष्ट्रातील सत्ताधारी जेव्हा गरज असेल तस महाराजांच्या नावावर राजकारण करतात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here