‘सेबी’च्या त्या नियमामुळे मीडकॅप व स्मॉलकॅपलाही मिळणार उभारी; ‘ते’ शेअर वधारू शकतात

सिक्योरिटी एंड एक्सचेंज बोर्ड आफ इंडिया (SEBI) यांनी म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूक करण्याच्या प्रक्रियेबाबत काही खास निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार आता एकूण रकमेच्या ७५ टक्के गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तसेच यातही लार्जकॅप, स्मॉलकॅप आणि मीडकॅप यांच्यामध्ये प्रत्येकी २५ टक्के अशी ही गुंतवणूक करण्याचा नियम जरी झालेला आहे.

यापूर्वी कोणत्या शेअरमध्ये किती गुंतवणूक करायची याचे काहीही नियम नव्हते. मग अशावेळी फ़क़्त लार्जकॅपमध्ये गुंतवणूक करून म्युच्युअल फंड चालवले जात होते. आता नव्या नियमानुसार इन्व्हेस्टमेंट 65 वरून ७५ टक्के आणि सर्व क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा नियम लागू झाला आहे. त्यामुळे स्मॉलकॅप आणि मीडकॅप यांच्यातील शेअरलाही अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

याबाबतच्या बातमीवर फायनान्शियल एक्स्प्रेसमध्ये बातमीत म्हटले आहे की, नव्या नियमानुसार समतोल राखण्यासाठी आता म्युच्युअल फंडांना लार्जकॅपमधील १४ हजार १०० कोटी रुपये कमी करावे लागतील. तसेच स्मॉलकॅपमध्ये २८ हजार कोटी आणि मीडकॅप यांच्यामध्ये १३ हरज ५०० कोटी इतकी गुंतवणूक करावी लागेल. त्यामुळे छोटे आणि मध्यम शेअर यांचे भाव वाढतील.

वरुन बेवरेजेज, अशोक लेलैंड, मैक्स फाइनेंशियल, विनाती र्आर्गनिक्स, क्रॉम्पटन कंज्यूमर, SRF, पीआई इंडस्ट्रीज, एनएचपीसी, जेके सीमेंट, इप्का लैब, गुजरात स्टेट पेट्रोनेट, फेडरल बैंक, चोलामंडलम इन्वेस्टमेंट या मीडकॅप शेअरमध्ये तर, स्मॉलकॅपमधील अतुल आटो, इक्विटास होल्डिंग, डिक्सॉन, रेडिको खेतान, रैलीज, कल्पतरू पावर, KNR कंस्ट्रक्शन, जेके लक्ष्मी, CESC, Firstsource सॉल्यूशंस, ग्रेनुअल्स इंडिया, गल्फ आयल ल्यूब्रिकेंट्स, नवीन फ्लोरीन, परसिसटेंट सिस्टम आदींच्या भावामध्ये वाढ होण्याची अपेक्षा फायनान्शियल एक्स्प्रेसच्या बातमीत वर्तवली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता.क. : शेअर बाजारातील गुंतवणूक ही स्वतः:चा अभ्यास करून करावी. कोणत्याही कंपनींच्या बातमीवर लगेच विश्वास ठेऊन गुंतवणूक करू नये. ही माहिती फ़क़्त रेफरन्ससाठी वापरावी.

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here