‘त्या’ ६ सरकारी कंपन्यांना लागणार कुलूप; इतरही ८ कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रियाही पूर्ण

संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या चालू आहे. या सत्रात पहिल्याच दिवशी माहिती देताना वित्त राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सरकारी कंपन्यांच्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ६ कंपन्यांना टाळे ठोकले जाणार आहे. ८ कंपन्यांमधील अंशतः विक्रीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून आणखी २० कंपन्यांची अशीच प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अनेक कंपन्या विकण्याचे नियोजन केले जात असल्याची टीका केली जात आहे. अशावेळी ही धक्कादायक माहिती मंत्री ठाकूर यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड (HFL), स्कूटर्स इंडिया, भारत पंप्स एंड कम्प्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफैब, हिंदुस्तान न्यूजप्रिंट आणि कर्नाटक एंटीबायोटिक्स एंड फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्यांना कुलूप लावले जाणार आहे.

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

तर, HPCL, REC, हॉस्पिटल सर्विसेज कंसल्टेंसी, नेशनल प्रॉजेक्ट कंस्ट्रक्शन कॉरपोरेशन, ड्रेजिंग कॉरपोरेशन, THDC इंडिया लिमिटेड, नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पावर कॉरपोरेशन लिमिटेड (NEEPCO) आणि कामाराजर पोर्ट यांच्यामधील हिस्सा विक्रीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तसेच प्रॉजेक्ट एंड डेवलपमेंट इंडिया लिमिडेट, इंजीनियरिंग प्रॉजेक्ट (इंडिया) लिमिटेड, ब्रिज एंड रूफ कंपनी इंडिया लिमिटेड, सीमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCI) यांचे यूनिट्स, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत अर्थ मूवर्स लिमिटेड (BEML), फैरो स्क्रैप निगम लिमिटेड आणि एनएमडीसी यांचा नागरनार स्टील प्लांट यांच्या निर्गुंतवणूक करण्याच्या प्रक्रियेला हाती घेतले आहे, असेही त्यांच्या लेखी उत्तरात म्हटलेले आहे.

यासह अलॉय स्टील प्लांट दुर्गापुर; सेलम स्टील प्लांट; सेल यांचे भद्रावती यूनिट, पवन हंस, एयर इंडिया आणि त्यांच्या पाच सहायक कंपन्या यांच्यामधील हिस्सा विक्रीचे काम चालू आहे. तर, एचएलएल लाइफ केयर लिमिटेड, इंडियन मेडिसिन एंड फार्मास्युटिकल्स कॉरपोरेशन लिमिटेड, आईटीडीसी यच्न्हे यूनिट्स, हिंदुस्तान एंटीबायोटिक्स, बंगाल केमिकल्स एंड फार्मास्युटिकल्स, भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (नुमालीगढ़ रिफाइनरी लिमिटेड वगळता), शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया, कंटेनर कॉरपोरेशन ऑफ इंडिया आणि नीलाचल इस्पात निगम लिमिटेड यांच्यामधील हिस्साही विकला जाणार आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here